एक अतिसामान भरलेला ट्रक  छैल या पर्यटनस्थळी जात असताना सोलन या ठिकाणाजवळील बैले हा ११० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल कोसळला. सफरचंदांच्या पेटय़ा असलेल्या ट्रकचे वजन तब्बल २० टन इतके होते. हा ट्रक शनिवारी अश्वनी खुदमध्ये कोसळला. त्यात तीन लोक जखमी झाले.
या पुलाची सामान वाहून नेण्याची क्षमता केवळ ९ टन इतकी आहे. परंतु ट्रकवाल्याने सामानक्षमतेची सूचना न वाचता आणि सुरक्षिततेचे कोणतेही उपाय न करताच ट्रक या पुलावरून नेला आणि त्यामुळे अपघात झाला, अशी माहिती सोलनचे जिल्हाधिकारी मदन चौहान यांनी दिली.
पतियाळाचे भूतपूर्व महाराज यांनी ब्रिटिश काळात १९०४ साली या पुलाची उभारणी केली होती. सोलन या ठिकाणापासून ४८ किलोमीटरवर असलेल्या साधुपूल येथे हा पूल आहे.

Story img Loader