उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने प्रियकराला भेटण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढविली होती. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गोरखपूरमधील तिवारीपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे. मागच्या तीन महिन्यांपासून सदर विद्यार्थीनी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आई-वडिलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकत होती. जेव्हा पालकांना गुंगी यायची तेव्हा तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा. मात्र नुकतेच तिचे बिंग फुटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे वाचा >> रुग्णालयाने पतीला मृत घोषित करताच पत्नीने केली आत्महत्या; मग कळले पती तर अजून जिवंत…

एकेदिवशी वडिलांना संशय आला आणि..

तीन महिन्यांपासून सदर प्रकार सुरू होता. संशय आल्यानंतर एकेदिवशी वडिलांनी जेवण घेतलेच नाही आणि ते झोपून गेले. जेव्हा रात्री प्रियकर घरात आला, तेव्हा त्याला वडिलांनी पकडून चांगलेच बदडून काढले. या गोंधळामुळे शेजारचे लोकही जमा झाले. तीन महिन्यांपासून सदर प्रकार सुरू होता. मात्र पालकांना त्याची जराही कल्पना नव्हती. मात्र संशय आल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने सदर पालकांनीच उघडकीस आणला.

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’; टोळीयुद्ध नेमकं कधी सुरू झालं? शरद मोहोळच्या खुनानंतर पोलिसांसमोर काय आव्हान?

शेजारचे लोक गोळा झाल्यानंतर प्रियकराची चांगलीच धुलाई झाली. यानंतर पोलिसांनाही बोलविण्यात आले. पोलिसांनी स्थानिकांना शांत करून प्रियकराची त्यांच्या तावडीतून सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी सांगितले की, आम्हाला सूचना मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो. मुलाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र यावर कुणीही तक्रार दाखल केली नसल्यामुळे मुलाला सोडून दिले आहे. मात्र यापुढे जर तक्रार दाखल केली तर या प्रकरणाचा तपास करू.