एपी, ओरेब्रो (स्वीडन) : स्वीडनध्ये ओरेब्रो शहरामधील ‘कॅम्पस रिसबर्गस्क’ या प्रौढांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेत मंगळवारी एका बंदूकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये बंदूकधाऱ्याचाही समावेश असून त्याचा हेतू मात्र अद्याप स्पष्ट झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वीडनमधील शाळांमध्ये हिंसाचार ही अतिशय दुर्मीळ बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारचा हल्ला हा स्वीडनमधील आतापर्यंतचा सर्वात भीषण सामूहिक गोळीबार होता. अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, गोळीबारात जखमी झालेल्या तीन महिला व दोन पुरुषांवर ओरेब्रो विद्यापीठ रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या हल्ल्याने संपूर्ण समाज हादरल्याची प्रतिक्रिया न्यायमंत्री गनर स्ट्रॉमर यांनी व्यक्त केली. तर राजे कार्ल सोळावे गुस्ताफ आणि पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी अनुक्रमे राजवाडा व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश दिले. ‘कॅम्पस रिसबर्गस्क’ शाळेत सज्ञानांसाठी प्राथमिक व माध्यमिक वर्ग चालवले जातात. तिथे स्थलांतरितांना स्वीडिश भाषा शिकवली जाते, व्यावसायिक शिक्षण दिले जाते तसेच गतिमंद प्रौढांसाठी उपक्रम राबवले जातात.