नितीश कुमारांच्या बिहारमध्ये नरेंद्र मोदींची सभा प्रचंड स्वरूपाची व्हावी यासाठी भाजप सर्वतोपरि प्रयत्न करत आहे. २७ ऑक्टोबर रोजी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची बिहारमध्ये जाहिर सभा होणार आहे. यापार्श्वभूमीवर तब्बल ११ रेल्वेगाड्या सभेला उपस्थित राहणाऱया मोदी समर्थकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मोदींची रामाला बगल
माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप समर्थक सुशील कुमार मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींच्या ‘हुंकार रॅली’ दरम्यान बिहारमध्ये मोदींचे जाहीर भाषण होणार आहे. त्यासाठी पक्षाच्या वतीने अकरा रेल्वेगाड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मोदींचे ज्याठिकाणी भाषण होणार आहे. त्या व्यासपीठावर ३० फूट उंच स्क्रिन उभारण्यात येणार आहे. या स्क्रिनमध्ये बिहारमधील बोधगया, नालंदा विद्यापीठ, गोलघर इत्यादी ऐतिहासीक स्थळांची छायाचित्रे दाखविण्यात येतील तसेच बिहारमधील महापुरुषांचेही दर्शन या स्क्रिनच्या माध्यमातून घडविण्यात येणार आहे. त्यात लोकनायक जयप्रकाश नारायण, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद इत्यादींचा समावेश आहे.
नरेंद्र मोदींचा फुगा फार काळ टिकणार नाही!- नितीश कुमार
‘सोन्याचा चमचा घेवून जन्मलेल्यांना गरीबी काय कळणार’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 trains 30 ft dynamic screen as backdrop for modis bihar rally
Show comments