दिल्लीत एका ११ वर्षांच्या मुलाची हत्या झाली. या घटनेनंतर पोलिसांनी ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी पूजा नावाच्या महिलेला अटक केली आहे. पूजाने दिव्यांश नावाच्या मुलाची हत्या केली. तो तिच्या बॉयफ्रेंडचा मुलगा होता. बॉयफ्रेंडने पूजासह राहण्यास नकार दिला आणि मुलासह बायकोबरोबर राहू लागला. या रागातून हे कृत्य पूजाने केलं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी पूजाला अटक केल्यावर पूजाने काय सांगितलं?

पोलिसांनी पूजाला अटक केल्यानंतर तिने ही माहिती दिली आहे की, मनोज माझ्यासह तीन वर्ष राहिला होता. मात्र नंतर तो मुलाकडे आणि बायकोकडे राहिला गेला. त्यामुळे त्या रागातून मी त्याच्या मुलाला मारलं. त्यानंतर मी जितेंद्रला फोन करुन हे देखील सांगितलं होतं की आज मी तुझी सर्वात मौल्यवाल गोष्ट हिरावून घेतली आहे. पूजाने दिल्ली पोलिसांना जो जबाब दिला त्यात ही माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाचा बॉयफ्रेंड जितेंद्र हा २०१९ पासून पूजासह लिव्ह इनमध्ये राहात होता. आपण आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेणार आहे असंही त्याने पूजाला सांगितलं. तसंच पूजाला मनोजने लग्नाचं आश्वासनही दिलं होतं. मात्र २०२२ मध्ये पूजाला सोडून मनोज दिव्यांश आणि त्याच्या पत्नीकडे परतला. या घटनेमुळे संतापलेल्या पूजाने मनोजचा मुलगा दिव्यांश याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपवला आणि तिथून पळ काढला. आता या प्रकरणात पूजाला पोलिसांनी अटक केली आहे.

आर्य समाज मंदिरात लग्न?

कथित माहितीनुसार १७ ऑक्टोबर २०१९ या दिवशी या दिवशी पूजा आणि मनोज या दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केलं होतं असंही समजतं आहे. या दोघांचं लग्न कोर्टात होऊ शकत नव्हतं कारण मनोजने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्रने पूजाला हे वचन दिलं होतं की तो लवकरच त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देईन. मात्र जितेंद्र घटस्फोट देत नव्हता. याच कारणावरुन दोघांमध्ये खटकेही उडत होते. अखेर २०२२ मध्ये जितेंद्र तिला सोडून पत्नीकडे राहायला गेला. याच रागातून पूजाने दिव्यांशची हत्या केली. १० ऑगस्टला तिने दिव्यांशची हत्या केली. या प्रकरणात पूजाला पोलिसांनी अटक केली आहे. इंडिया टुडेने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 year boy divyansh murder pooja called her boy friend and said today i finished him scj