पीटीआय, गुवाहाटी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आसाममध्ये सुमारे ११,६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले.खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्राच्या अनेक प्रकल्पांचे अनावरण केले.

मोदींनी यावेळी प्रमुख प्रकल्पांच्या पायाभरणीची घोषणा केली आणि मोठय़ा प्रमाणात निधी जाहीर केला. यामध्ये कामाख्या मंदिर कॉरिडॉर (४९८ कोटी), गुवाहाटीमधील नवीन विमानतळ टर्मिनलपासून सहा पदरी रस्ता (३५८ कोटी), नेहरू स्टेडियमचे फिफा मानकांमध्ये सुधारणा (८३१ कोटी) यांचा समावेश आहे. पंतप्रधान ‘असोम माला’ रस्त्यांच्या दुसऱ्या आवृत्तीचे लोकार्पण केले. या टप्प्यात एकूण ३,४४४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ४३ नवीन रस्ते आणि ३८ काँक्रीट पुलांचा समावेश असेल. याशिवाय ३,२५०  कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या एकात्मिक नवीन इमारतीची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली. ५७८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित करीमगंज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची आणि गुवाहाटीमध्ये २९७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या युनिटी मॉलची पायाभरणीही पंतप्रधान मोदी केली.

हेही वाचा >>>“भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव”, अरविंद केजरीवाल यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “तिकडे गेलं की सगळे खून…”

मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली की, स्वातंत्र्यानंतर सत्तेत असलेल्यांना धार्मिक स्थळांचे महत्त्व समजले नाही. त्यांना स्वत:च्या संस्कृतीची लाज वाटत होती असा आरोप मोदी यांनी केला. राजकीय फायद्यांमुळे, त्यांनी स्वत:च्या संस्कृतीची आणि भूतकाळाची लाज बाळगण्याचा ट्रेंड सुरू केला असा दावा मोदींनी काँग्रेसचे नाव न घेता  केला. कोणताही देश आपला भूतकाळ विसरून, पुसून टाकून आणि त्याची मुळे तोडून विकास करू शकत नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>>“भाजपात जाण्यासाठी माझ्यावर दबाव”, केजरीवालांच्या वक्तव्यावर गौतम गंभीरचा टोला, म्हणाला…

कोअर कमिटी पदाधिकाऱ्यांशी चर्चा

आमास दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या राज्य कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि पक्षाच्या घडामोडींवर चर्चा केली, असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. या बैठकीत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राज्यमंत्री रणजीत कुमार दास, प्रदेशाध्यक्ष भाबेश कलिता आणि इतर नेते उपस्थित होते.