चीनच्या ईशान्येकडील एका पोल्ट्री कारखान्यास लागलेल्या आगीत ११९ जण मृत्युमुखी पडले असून, ५४ जण जखमी झाले आहेत. जिलिन प्रांताच्या देहुई शहरातील मिशाझी भागात असलेल्या जिलिन पोल्ट्री कंपनीत सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हे अग्नितांडव घडले. चीनमध्ये गेल्या दशकभरातील ही सर्वात भीषण दुर्घटना ठरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आतापर्यंत ११९ जण मरण पावले असले तरी मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हे अग्निकांड घडले तेव्हा कारखान्यात ३०० हून अधिक कामगार होते. या आगीचे कारण समजू शकले नाही, परंतु एका प्रत्यक्षदर्शीने त्या ठिकाणी स्फोटाचा आवाज ऐकला तसेच द्रवरूप अमोनियाच्या गळतीचाही त्याने संशय व्यक्त केला. या संबंधीची माहिती सीसी टीव्हीवरून देण्यात आली. कारखान्यातील वीजयंत्रणेत पडलेल्या ठिणग्यांवरूनही ही आग लागली असावी, असा संशय आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in