केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) कर्मचारी आणि स्थानिक टॅक्सीचालक यांच्यात उडालेल्या चकमकीत १२जण जखमी झाले आहेत. अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील बालताल छावणीजवळ सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ टॅक्सीचालकांनी निदर्शने केली तेव्हा ही चकमक उडाली.
सीआरपीएफ कर्मचाऱ्यांशी खटका उडाला असता गुलाम नबी लोणे या टॅक्सीचालकास कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये लोणे गंभीर जखमी झाला. या घटनेविरुद्ध निदर्शने करण्यात आली तेव्हा चकमक उडाली. तिघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader