Terrorists Attack पाकिस्तानातल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दोन बॉम्बस्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचं वृत्त आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण ठार झाले. हा पूर्वनियोजित दहशतवादी हल्ला होता अशी माहिती समोर आली आहे. एपीच्या वृत्तानुसार या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि हल्लेखोर यांच्यात चकमकही झाली. या दहशतवादी हल्ल्यामागे ( Terrorists Attack ) जैश उल फुरसान या दहशतवादी संघटनेचा हात आहे अशी चर्चा आहे.

नेमकी काय घटना घडली?

समोर आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी दो कार बॉम्बचा उपयोग या ठिकाणी केला. सुरक्षा दलांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी हे केलं. त्यानंतर लक्ष्यपूर्वक हल्ला ( Terrorists Attack ) केला. दहशतवाद्यांनी इफ्तारनंतर बन्नू केंट या ठिकाणी असलेल्या सुरक्षा कड्यावर हल्ला केला. हल्ला करणारे सहा ते सात दहशतवादी होते अशीही माहिती समोर आली आहे. याआधी सोमवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका महिला सुसाइड बॉम्बरने हल्ला केला. पॅरामिलिट्री फ्रंटियर कोअरवर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आता खैबर पख्तूनख्वा या ठिकाणी हल्ला ( Terrorists Attack ) करण्यात आला आहे.

ठार झालेल्या १२ जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश

खैबर पख्तूनख्वा हा प्रांत पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागात आहे. या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तीन लहान मुलांसह १२ जण ठार झाले आहेत. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रमजानचा उपवास सोडत असतानाच हा हल्ला झाला त्यामुळे एकच खळबळ उडाली. या ठिकाणी आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. तसंच धुराचे आणि धुळीचे लोटही मोठ्या प्रमाणावर उठले होते.

पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले?

रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. या दरम्यान उपवास सोडणाऱ्या नागरिकांवर भ्याड हल्ला ( Terrorists Attack ) करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवतो. जे लोक ठार झाले त्यामध्ये तीन लहान मुलं दोन महिला यांचाही समावेश आहे. दरम्यान सुरक्षा दलांची आणि दहशतवाद्यांची चकमक झाली त्या चकमकीत ५ ते ६ दहशतवादी ठार झाले अशीही माहिती समोर आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने हल्ल्याबाबत काय सांगितलं?

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की दहशतवाद्यांनी जे स्फोट घडवून आणले त्यामुळे चार फुटांचे दोन खड्डे त्या ठिकाणी झाले. तसंच आठ घरांची या हल्ल्यामुळे पडझड झाली. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

Story img Loader