तालिबान्यांनी रविवारी देशाचा ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिक देश सोडून पळून जाण्यासाठी धडपड करत आहेत. रविवारी विमानतळाबाहेर तर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. इतकंच नाही तर काही नागरिक अमेरिकन लष्कराच्या विमानाला लटकले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर खाली पडून या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान काबूल विमानतळावर आतापर्यंत १२ नागरिक ठार झाले आहेत. नाटो आणि तालिबानच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रॉयटर्नसे यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

VIDEO: “आम्हाला वाचवा, तालिबानी येतायत;” अमेरिकेच्या सैन्यासमोर अफगाणिस्तानी महिलांचा आक्रोश

तालिबानच्या बंडखोराने रॉयटर्सशी बोलताना नागरिकांना काबूल विमानतळाबाहेर गेटवर गर्दी करु नये असं आवाहन केलं आहे. तसंच उड्डाण करून देशाबाहेर जाण्याचे कायदेशीर हक्क नसतील तर घरी जावं असंही सांगितलं आहे. “आम्हाला विमानतळावर कोणालाही इजा पोहोचवायची नाही आहे,” असं त्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर म्हटलं आहे.

अमेरिकन विमानाच्या लॅण्डिंग गेअरमध्ये सापडले मानवी अवशेष

अमेरिकन हवाई दलाच्या सी-१७ या विमानाच्या लॅण्डींग गेअरमध्ये मानवी अवशेष आढळून आले आहेत. या विमानाने काबूल विमानतळावरुन अमेरिकन नागरिकांना घेऊन उड्डाण केलं होतं तेव्हा देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात काही जणांनी विमानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लपून प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी द वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या तपासणीदरम्यान लॅण्डीग गेअरमध्ये चाकाजवळ मृतदेहाचे अवशेष आढळून आले. ग्लोबमास्टर प्रकारातील हे अवाढव्य हे विमान अमेरिकन नागरिकांना घेऊन कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर उतरलं होतं.

अफगाणिस्तानवर रविवारी तालिबानने कब्जा केला. तालिबानने राजधानी काबूलवर ताबा कब्जा करत शांततापूर्ण मार्गाने सत्तांतरण सुरु असल्याचं जाहीर केलं. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर करण्याची तयारी तालिबानने सुरु केल्याची माहिती समोर आली. तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यास सुरुवात करताना नागरिकांनी पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केल्याचं चित्र रविवारी सायंकाळपासून दिसत होतं.

नागरिकांचा विरोध, तालिबानचा हिंसक प्रतिसाद

दरम्यान अफगाणिस्तानच्या पूर्व भागात नागरिकांनी बुधवारी दर्शवलेला विरोध या दहशतवादी संघटनेने हिंसकरीत्या मोडून काढला. यात एकजण ठार, तर सहा जण जखमी झाले. अफगाणिस्तानातील ब्रिटिश राजवट १९१९ साली ज्या दिवशी संपुष्टात आली, तो देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक दिवस आधी अनेक नागरिक पूर्व भागातील जलालाबादमध्ये गोळा झाले होते. तालिबानने या भागावर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथे उभारलेला झेंडा या लोकांनी खाली उतरवला.

गोळा झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबानी हवेत गोळीबार करत असल्याचा आणि लोकांवर हल्ले चढवत असल्याचे नंतर व्हिडीओ चित्रीकरणात दिसून आले. या असंतोषाचे चित्रीकरण करू पाहणाऱ्या एका पत्रकारासह टीव्ही कॅमेरामनला दहशतवाद्यांनी मारहाण केली. या हिंसाचारात किमान १ जण ठार, तर सहा जण जखमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या एका स्थानिक अधिकाऱ्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

Story img Loader