राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूने गेल्या ४८ तासांत आणखी १२ बळी घेतले असून राज्यात नवीन वर्षांत स्वाइन फ्लूने घेतलेल्या बळींची संख्या १०४ झाली आहे, असे राज्याच्या वैद्यकीय व आरोग्य खात्याने म्हटले आहे.
गेल्या ४८ तासांत जोधपूर, सिकर, नागौर जिल्ह्य़ात एच१ एन१ विषाणूने प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला तर बारमेर, कोटा, भरतपूर, भिलवाडा, चित्तोडगड व चुरू जिल्ह्य़ात प्रत्येकी एक जण मरण पावला. १ जानेवारीपासून १०३७ रुग्णांना एच१ एन १ विषाणूची लागण झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे, आतापर्यंत १०४ जण स्वाइन फ्लूने मरण पावले आहेत.
राजस्थानातील ३३ जिल्ह्य़ांपैकी २९ जिल्ह्य़ांना स्वाइन फ्लूचा फटका बसला असून ढोलपूर, हनुमानगड, सिरोही व बरण जिल्ह्य़ात तुलनेने सुरक्षित स्थिती आहे असे आरोग्य खात्याच्या नोंदींवरून दिसून आले आहे. अजमेर व जयपूर येथे सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १९ जण मरण पावले आहेत. नागौर येथे ९, बारमेर व चित्तोडगड येथे ७, बन्सवारा, जोधपूर, कोटा येथे प्रत्येकी ५, टोंक बिकानेर येथे प्रत्येकी ४, भिलवाडा, दौसा, पाली, बुंदी, उदयपूर व सिकर येथे प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
गंगानगर, अल्वर, झुंझनू, जैसलमेर, भरतपूर, चुरू व डुंगरपूर येथे प्रत्येकी एक जण मरण पावला आहे.
राजस्थानात स्वाइन फ्लूचे आणखी १२ बळी
राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूने गेल्या ४८ तासांत आणखी १२ बळी घेतले असून राज्यात नवीन वर्षांत स्वाइन फ्लूने घेतलेल्या बळींची संख्या १०४ झाली आहे,
First published on: 11-02-2015 at 02:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 more die of swine flu in rajasthan