राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूने गेल्या ४८ तासांत आणखी १२ बळी घेतले असून राज्यात नवीन वर्षांत स्वाइन फ्लूने घेतलेल्या बळींची संख्या १०४ झाली आहे, असे राज्याच्या वैद्यकीय व आरोग्य खात्याने म्हटले आहे.
गेल्या ४८ तासांत जोधपूर, सिकर, नागौर जिल्ह्य़ात एच१ एन१ विषाणूने प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला तर बारमेर, कोटा, भरतपूर, भिलवाडा, चित्तोडगड व चुरू जिल्ह्य़ात प्रत्येकी एक जण मरण पावला. १ जानेवारीपासून १०३७ रुग्णांना एच१ एन १ विषाणूची लागण झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे, आतापर्यंत १०४ जण स्वाइन फ्लूने मरण पावले आहेत.
 राजस्थानातील ३३ जिल्ह्य़ांपैकी २९ जिल्ह्य़ांना स्वाइन फ्लूचा फटका बसला असून ढोलपूर, हनुमानगड, सिरोही व बरण जिल्ह्य़ात तुलनेने सुरक्षित स्थिती आहे असे आरोग्य खात्याच्या नोंदींवरून दिसून आले आहे. अजमेर व जयपूर येथे सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १९ जण मरण पावले आहेत. नागौर येथे ९, बारमेर व चित्तोडगड येथे ७, बन्सवारा, जोधपूर, कोटा येथे प्रत्येकी ५, टोंक बिकानेर येथे प्रत्येकी ४, भिलवाडा, दौसा, पाली, बुंदी, उदयपूर व सिकर येथे प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
गंगानगर, अल्वर, झुंझनू, जैसलमेर, भरतपूर, चुरू व डुंगरपूर येथे प्रत्येकी एक जण मरण पावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा