गडचिरोली : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरूच असून सुकमा जिल्ह्यात १० मे रोजी सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. या कारवाईत तब्बल १२०० जवानांचा सहभाग होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. त्यातच माओवाद्यांचा ‘टीसीओसी’ कालावधी सुरु आहे. या कालावधीत ते सुरक्षा जवानांवर हल्ले करण्याची शक्यता असते. १० मे रोजी सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडिया जंगलात नक्षलवादी व पोलिसांत जोरदार चकमक उडाली. विजापूर, बस्तर व सुकमा या तीन जिल्ह्यांच्या तब्बल १२०० जवानांनी नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यात १२ नक्षलवादी ठार झाले.

nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

हेही वाचा >>>ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा धक्का! महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित; न्यायालय म्हणाले…

मोठा शस्त्रसाठा जप्त

घटनास्थळाहून सुरक्षा जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या चकमकीदरम्यान आणखी काही माओवादी जखमी असल्याची माहिती आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत.

१० दिवसांतील दुसरी मोठी कारवाई

छत्तीसगड सीमेवरील अबूझमाड जंगलात ३० एप्रिलला छत्तीसगडमधील सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांत चकमक झाली होती. त्यानंतर दहा दिवसांतच ही चकमक झाली आहे.