गुजरातमध्ये १२ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. जवळपास एक वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यता आलं. धक्कादायक म्हणजे, पीडित मुलीच्या आईने आरोपींना यासाठी मदत केली होती. सध्या आरोपी महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. “पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आपल्या मुलीवर तिघांकडून वारंवार बलात्कार करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच यामध्ये आपल्या पत्नीचाही सहभाग असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. वडील घरातून बाहेर गेल्यानंतर आरोपी आपल्यावर अत्याचार करत असत अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सर्व तिन्ही आरोपींची ओळख पटली आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून पीडितेच्या आईचा शोध घेतला जात आहे.

Story img Loader