स्कूलबसमधून घरी जाताना एका १२ वर्षीय मुलाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये उघडकीस आली आहे. मनीष जाटव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शुक्रवारी (१६ डिसेंबर) रोजी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा – सुप्रीम कोर्टातही बिल्किस बानो यांच्या पदरी निराशाच! ११ दोषींच्या सुटकेविरोधात केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली!

Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
college youth died, bullet hit the divider in pune,
पुणे : बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू, बुलेटच्या धडकेत पादचारी ज्येष्ठासह दोघे जखमी
A 15 year old girl was saved by advanced treatment in Pune print news
मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचूनही ‘ती’ बचावली! पंधरा वर्षीय मुलीची कहाणी
dombivli school boy died
डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, एक विद्यार्थी गंभीर जखमी
iit delhi student suicide news marathi
IIT विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये मृत्यू, आत्महत्येचा संशय; हत्येची शक्यता पोलिसांनी फेटाळली!
lightening strike on front of man while he shooting in mobile shocking video goes viral on social media
मरण इतक्या जवळून कधी पाहिलंय का? घराच्या बाहेर येताच घडलं भयंकर; हृदय कमकूवत असेल तर हा VIDEO पाहूच नका
TRAGIC! Hyderabad Youth Falls Off 3rd Floor Of Hotel Building While Trying To Shoo Away Dog
मृत्यू आपल्याला कसा जाळ्यात ओढतो पाहा; तरुणाच्या मृत्यूचा थरारक VIDEO बघून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

मनीष चौथ्या वर्गात शिकत असून शुक्रवारी दुपारी त्याने शाळेत आपल्या भावाबरोबर जेवण केले. त्यानंतर तो स्कूलबसमध्ये बसून घरी जाण्यासाठी निघाला. मात्र, घरी पोहचण्यापूर्वीच त्याची तब्बेत बिघडल्याने स्कूलबस चालकाने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ”आम्ही मनीषला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वाचवू शकलो नाही”, अशी प्रतिक्रिया जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अनिल गोयल यांनी दिली.

हेही वाचा – राजा असाल तरच ‘महाराजा’ मध्ये होईल शाही थाट, १९ लाख रुपये तिकिट असणाऱ्या ट्रेनची खासीयत माहितेय का? पाहा video

दरम्यान, मनीषच्या कुटुबियांनी शवविच्छेदन करण्यासाठी नकार दिल्याने मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. तसेच मनीषला आरोग्याबाबत कोणतीही समस्या नव्हती, अशी माहिती मनीषच्या वडिलांनी दिली.