पीटीआय, वायनाड (केरळ)

केरळच्या वायनाड येथे मंगळवारी भूस्खलन होऊन किमान १२३ जण ठार, तर १२८ जण जखमी झाले आहेत. आपत्तीग्रस्त भागांत शोध व बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पहाटे दोन आणि साडेचार वाजता दोन ठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती दिली असली, तरी संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. पहाटेच्या वेळी घटना घडल्यामुळे गावकऱ्यांना पळण्याची संधी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेपाडी भागात भूस्खलन झाले असून मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही फटका बसला आहे. मृतांत महिला व मुलांची संख्या अधिक असल्याचे समजते.

हेही वाचा >>>दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या तक्रारींसाठी डॅशबोर्ड तयार करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रीय आयुष मंत्रालयाला आदेश

वायनाडमधील भूस्खलनांमुळे व्यथित आहे. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल. याबाबत केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्याशी चर्चा करून केंद्रातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मी केरळचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व संस्थांदरम्यान समन्वय राखला जाईल याची खबरदारी घेण्याची विनंती मी त्यांना केली आहे. कोणत्याही मदतीची गरज असेल तर कळविण्यास सांगितले आहे.- राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा