वृत्तसंस्था, बीजिंग
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तिबेटमध्ये मंगळवारी सकाळी आलेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये किमान १२६ जण ठार झाले आणि १८८ जण जखमी झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदली गेली. मात्र, ‘यूएस जिऑलॉजिकल सर्व्हिस’ने भूकंपाची तीव्रता ७.१ असल्याचे नोंदवले. या भूकंपामध्ये तिबेटमध्ये किमान एक हजार घरे पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भूकंपाचे धक्के नेपाळमध्येही बसले. तेथील अनेक इमारती हादरल्या, तसेच शेकडो घरे पडली. नागरिक जीव वाचवण्यासाठी बाहेर रस्त्यावर पळाले. त्यानंतरही ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची भीती आहे. नेपाळच्या काठमांडूसह कावरेपालनचौक, सिंधुपालनचौक, धाडिंग आणि सोलुखुंबू जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
हेही वाचा >>>फ्रान्सच्या अतिउजव्या नेत्याचे निधन; स्थलांतरितांना कठोर विरोध करणारे ज्यँ मारी ल पेन कालवश
चीनच्या प्रादेशिक आपत्ती निवारण मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंग वेळेनुसार ९.०५ वाजता तिबेटमधील झिगाझेमधील (शिगास्ते) डिंगरी काउंटीला भूकंपाचे जोरदार हादरे बसले. हा भाग भारताच्या सीमेपासून जवळ आहे. भारताच्या काही भागांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के बसले. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भूकंपग्रस्त भागामध्ये बचाव व मदत कार्य करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे आदेश दिले. जखमींवर उपचार करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जावे, दुय्यम भूकंपाचे हादऱ्यांनी पुन्हा नुकसान टाळावे, भूकंपग्रस्त रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करावे आणि नंतरचे काम प्रभावीपणे हाताळावे अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार, भूकंपग्रस्तांसाठी कापडी तंबू, रजया आणि घडीची अंथरुणे, उंचावरील थंड जागेसाठी विशेष मदत सामग्री अशा २२ हजार आपत्ती निवारण वस्तू पाठवण्यात आल्या.
हेही वाचा >>>Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral
शिगास्ते हे तिबेटमधील सर्वात पवित्र क्षेत्रांपैकी एक मानले जाते. तिथे पंचेन लामाची पारंपरिक गादी आहे. तिबेटींचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना केली.
भूकंपाचा केंद्रबिंदू : भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटच्या डिंगरी काउंटीच्या त्सोगो टाउनशिप येथे होता. या टाउनशिपच्या २० किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रात २७ गावे असून त्यांची एकूण लोकसंख्या जवळपास ६,९०० इतकी आहे. त्सोगो टाउनशिप नेपाळच्या ईशान्येला खुंबू हिमालय पर्वतरांगेतील लोबुत्सेच्या ईशान्येला ९० किलोमीटर अंतरावर आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर अंतरावर होता.