मणिपूरमध्ये गोळीबाराची घटना समोर आली. या घटनेनंतर १३ अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत. तेंगनौपाल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. आज ( ४ डिसेंबर ) दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडिया टुडे’ला एका लष्करी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, तेंगनौपाल जिल्ह्यातील लेथू गावात गोळीबार झाल्याची माहिती आसाम रायफल्सला मिळाली. त्यानंतर आसाम रायफल्सचे सैनिक लेथू गावात पोहचले. तेव्हा १३ मृतदेह आढळले आहेत. सैन्याला मृतदेहांजवळ कुठलही शस्त्रे आढळली नाहीत.

मृतांमधील एकही व्यक्ती स्थानिक रहिवाशी नाही. मृत व्यक्ती लेथू गावात आले. तेव्हा दुसऱ्या गटाशी त्यांचा वाद झाला. यातूनच गोळीबाराची घटना घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. ३ मे नंतर घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पण, नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारनं इंटरनेट पूर्णवत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 bodies recovered in manipur after firing incident in tengnoupal district ssa