अवामी नॅशनल पार्टीचा नेता बशीर खान उमरझीसह १३ जण एका स्फोटात जखमी झाले. बशीर खैबर-पख्ततून प्रांतांतून मोटरसायकलवरून जात असताना रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा शनिवारी स्फोट झाला. हा स्फोट रिमोट कंट्रोलने करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. स्फोटात जखमी झालेल्या सर्वाना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नसली तरी बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-तालिबान या संघटनेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader