तेहरान : इराणचे बोईंग मालवाहू विमान किरगीझस्तान येथून येत असताना सोमवारी इराणची राजधानी तेहरान येथील विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोसळून त्यात १३ जण ठार झाले आहेत. यात तीन जण वाचल्याचे समजते, त्यात एका अभियंत्याचा समावेश आहे.  विमान कोसळल्यानंतर पेटले. धावपट्टीवर ते घासत गेले व फाथ विमानतळ व निवासी भागाच्या मधील भिंतीवर जाऊन आदळले. या विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे

इराणच्या प्रसारमाध्यमांनी त्याची छायाचित्रे प्रसारित केली असून त्यात विमानाचा मागचा भाग जळताना दिलत आहे. यात आजूबाजूची काही घरे जळून गेली आहेत. पाथ विमानतळावर हे विमान कोसळले ते पॅरामिलिटरी रेव्होल्यूशनरी गार्डचे होते. ते पायम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. पण ऐनवेळी ते वेगळ्याच विमानतळावर उतरवण्याचा निर्णय का घेण्यात आला हे समजलेले नाही. उतरण्यापूर्वी विमानातील कर्मचाऱ्यांनी आणीबाणीची स्थिती जाहीर केली होती.

इराणच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रमुख पिरहोसेन कोलिवांद यांनी सांगितले की, विमानात १३ जण होते त्यात एक अभियंता वाचला आहे. इराणी प्रसारमाध्यमांच्या मते यातील सात मृतदेह सापडले आहेत. हे विमान किरगीझस्तान येथील बिशकेक येथून मांस घेऊन इराणला येत होते. इराणच्या हवाई दलाने सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यात येत असून हे विमान कुणाच्या मालकीचे आहे हे समजलेले नाही. जनरल शाहीन ताघीखानी यांनी सांगितले की, विमान व लोक दोन्ही इराणचे होते. इराणच्या हवाईदलातही बोईंग ७०७ विमाने आहेत व नागरी हवाई सेवेतही त्यांचा समावेश आहे.

Story img Loader