पाकिस्तानात अतिरेकी कारवायांनी ग्रासलेल्या पश्चिमोत्तर भागातील लष्कराच्या सुरक्षा चौकीवर तालिबानी दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात निमलष्करी दलाच्या १३ सैनिकांसह ३५ जण ठार झाले.
मृतांत १२ अतिरेक्यांचाही समावेश आहे. चार दहशतवाद्यांच्या मृतदेहांवर आत्मघाती जॅकेट आढळले. या हल्ल्यात दहा नागरिकही ठार झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली.
या वेळी आठ सैनिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी चौकीवर केलेल्या या रॉकेट हल्ल्यादरम्यान एकाच कुटुंबातील दहाजण दगावल्याचे पोलिसांनी सांगितले. दहशतवाद्यांनी एका घरावर हल्ला करून आणखी दोघांना ठार केले.
दरम्यान, तेहरिक-ए-तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अमेरिकेने नुकत्याच केलेल्या द्रोण हल्ल्यात तालिबानचे दोन कमांडर ठार झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे इहसान याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा