भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या १३ जवानांची नेपाळने सुटका केली आहे. भारताच्या या जवानांनी नेपाळमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना नेपाळच्या सीमा सुरक्षा दलाने झापामध्ये ताब्यात घेतले होते.
तेल तस्करांचा पाठलाग करताना भारतीय जवानांचे एक पथक नेपाळच्या सीमेत दाखल झाले. त्यानंतर नेपाळच्या बॉर्डर गार्ड्सनी त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन एपीएफच्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले. अखेर आज दुपारी त्यांची सुटका झाल्याची माहिती बी. डी. शर्मा यांनी दिली. भारत – नेपाळ सीमेवरून नेपाळच्या सीमा सुरक्षा दलाने आज सकाळी १३ भारतीय जवानांना ताब्यात घेतले होते, एसएसबीचे महासंचालक बी.डी.शर्मा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र काही काळानंतर त्या १३ जवानांना सोडून देण्यात आले.
दरम्यान संपूर्ण नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळ-भारत सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून नाकेबंदी सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2015 रोजी प्रकाशित
१३ भारतीय जवानांची नेपाळकडून सुटका
भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या १३ जवानांची नेपाळने सुटका केली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 29-11-2015 at 15:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 ssb personnel detained by nepalese border guarding force released