सध्या इंटरनेटचा वापर अधिकाधिक वाढत असून सन २०१७ पर्यंत भारतातील तब्बल १३४ दशलक्ष मुले ऑनलाइन सुविधेचा वापर करतील. २०१२ पर्यंत ऑनलाइनचा वापर करणाऱ्या मुलांची संख्या केवळ ४० दशलक्ष इतकी होती. मात्र २०१७ पर्यंत त्यात तीन पटीने वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. भारताचा विचार करता २०१७ पर्यंत ९५ दशलक्ष मुले नव्याने ऑनलाइनचा वापर करणार आहेत, तर २०१७ पर्यंत एकूण मुलांची संख्या १७६ दशलक्ष इतकी होईल आणि मोबाइल उपकरणाचा प्राधान्याने वापर करतील, असा निष्कर्ष अभ्यासातून काढला आहे. टेलेनर ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन फ्रेड्रिक यांच्या मते इंटरनेटचा अतिरेकी वापर होत आहे. मात्र याबाबत अधिक बेजबाबदार राहणे धोक्याचे ठरेल. इंटरनेटच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अधिकाधिक पारदर्शकता निर्माण करण्यासाठी या अभ्यासाचा वापर करण्यात येईल. तसेच ऑनलाइन जगताची चांगली ओळख तरुणांना व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे फ्रेड्रिक यांनी स्पष्ट केले.
भारतातील १३४ दशलक्ष मुले २०१७ पर्यंत ऑनलाइन होणार
सध्या इंटरनेटचा वापर अधिकाधिक वाढत असून सन २०१७ पर्यंत भारतातील तब्बल १३४ दशलक्ष मुले ऑनलाइन सुविधेचा वापर करतील. २०१२ पर्यंत ऑनलाइनचा वापर करणाऱ्या मुलांची संख्या केवळ ४० दशलक्ष इतकी होती.
First published on: 05-03-2013 at 04:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 134 milions students of india will become online before