करोनामुळे १४ दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गुजरातमधील सूरतमध्ये ही घटना घडली आहे. बाळाच्या आईला करोना असल्याने १ एप्रिल रोजी बाळाचा जन्म झाला तेव्हाच त्याला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. डायमंड रुग्णालयाने यासंबंधी निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

बाळाच्या आईला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं होतं. तर बाळावर उपचार सुरु होते. प्रकृती बिघडू लागल्यानंतर बाळाला रेमडेसिवीरचं इंजेक्शनही देण्यात आलं होतं. बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. नुकतीच करोनावर मात करणारे सूरतचे माजी महापौर जगदीश पटेल यांनी बाळावरील उपचारासाठी आपला ब्लड प्लाझ्मा दान केला होता. पण दुर्दैवाने बाळाचा जीव वाचू शकला नाही.

Story img Loader