शियापंथीयांना घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १४ जण ठार झाल्याचे इराक पोलिसांनी सांगितले.
दहशतवाद्यांनी प्रथम जवळच्या लष्करी तळावर रॉकेटने हल्ला केला आणि त्यानंतर दळणवळण मनोऱ्यावर बॉम्बहल्ला केला त्यामुळे सुरक्षा रक्षकांचे लक्ष दुसरीकडे वळले आणि तीच संधी साधून दहशतवाद्यांनी ट्रकच्या ताफ्यावर हल्ला चढविला, असे तूझ खोरमोटो या उत्तरेकडील शहराच्या पोलीस प्रमुखांनी सांगितले.
सारहा गावाजवळ बुधवारी हा हल्ला चढविण्यात आला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या १४ जणांमध्ये सर्वजण बगदादमधील शियापंथीय ट्रकचालक आणि त्यांचे सहकारी यांचा समावेश आहे. डोक्यात गोळ्या झाडण्यात आलेले त्यांचे मृतदेह मिळाले, असेही पोलीस प्रमुखांनी सांगितले.
इराकमध्ये गेल्या एप्रिल महिन्यापासून सरकारी सुरक्षारक्षक आणि नागरिकांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये आतापर्यंत तीन हजार जण ठार झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा