Kerala Nurses Fraud Kuwaiti Bank : कुवेतमध्ये नोकरीसाठी गेलेल्या शेकडो नर्सेसनी गल्फ बँकेची ७०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे. या नर्सेसनी गल्फ बँकेकडून मोठ्या रकमेची कर्जे घेतली होती. त्यानंतर या कर्जाची परतफेड न करता त्यांनी कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देशांमध्ये स्थलांतर केले. आरोग्य मंत्रालयासोबत काम करताना कर्ज घेतलेल्या आणि त्याची परतफेड न करत फरार झालेल्या १० जणांविरुद्ध गल्फ बँकेचे उपमहाव्यवस्थापक मोहम्मद अब्दुल वासी यांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे केरळमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केरळमध्ये गल्फ बँकेचे प्रतिनिधीत्व करणारे वकील थॉमस जे अनाकल्लुम यांनी देलेल्या माहितीनुसार, “या प्रकरणातील बहुतेक नर्सेसनी बँँकेकडून कर्जे घेऊन त्याची परतफेड केली होती. पण, जेव्हा युरोप, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये वैद्यकीय सहायक्कांची मागणी वाढली तेव्हा त्यांनी मोठी कर्जे घेतली आणि कुवेत सोडला.” दरम्यान या फसवणूक प्रकरणात सहभागी असलेल्यांपैकी केरळमधील १४२५ नर्सेसची ओळख पटली आहे. या सर्व आरोपी सध्या कुवेतमध्ये नसल्यामुळे बँक त्यांच्यावर पुढील कारवाई करू शकत नाही.

Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
Chandrapur district bank latest marathi news
चंद्रपूर जिल्हा बँकेची वादग्रस्त नोकर भरती: आजपासून मुलाखत
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
fraud with aqua marine global culture company
एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीची फसवणूक
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल

हे हे वाचा : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल

भारतात खटला चालू शकतो का?

दरम्यान ज्या १० आरोपी नर्सेसची ओळख पटली आहे, त्यापैकी एकीने कोचीमध्ये अलिशान आपार्टमेंटमध्ये घर घेतले आहे. तसेच ती कोचीतीलच एका रुग्णालयात नोकरी करत आहे. या प्रकरणातील आरोपी कुवेतमध्ये नसल्यामुळे, बँकेने प्रथम कायदेशीर संस्थांकडून भारतातील थकबाकीदारांवर काही कारवाई केली जाऊ शकते का? याबाबत सल्ला घेतला. यानंतर फसवणूक जरी कुवेतमध्ये झाली असली तरी, भारतीय कायद्यानुसार त्यांच्यावर भारतात खटला चालवण्याची तरतूद असल्याचे समजल्यानंतर बँकेने केरळमध्ये गुन्हे दाखल केले.

हे ही वाचा : डोनाल्ड ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय! जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा बदलणार

काय होती फसवणुकीची पद्धत?

बँकेची अशाप्रकारे फसवणूक होत असल्याचे तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. आरोपी सुरुवातीला छोटी कर्जे घ्यायच्या, त्याची परतफेड करत बँकेचा बँकेचा विश्वास संपादन करायच्या. यानंतर त्या मोठी कर्जे घेऊन मायदेशी किंवा ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युरोपियन देशांमध्ये पळून जायच्या. या फसवणुकीमागे सुनियोजित कट असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

Story img Loader