केरळ पोलिसांनी मंगळवारी एका स्थानिक भाजपा नेत्याच्या पॉल्ट्री फार्मवर छापा टाकला. पॉल्ट्री फार्मच्या गोदामातील एका खोलीत विदेशी मद्याच्या १४ हजार बाटल्या आढळून आल्या. तसेच २,४०० लिटर स्पिरीटही आढळून आले आहे. पोलिसांनी सर्व मुद्दे माल जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गूप्त वार्ता मिळाल्यानंतर केरळ पोलिसांनी स्थानिक भाजपा नेता आणि माजी पंचायत सदस्य ५० वर्षीय लालू आणि त्याचा सहकारी ५२ वर्षीय लॉरेन्सला अटक केले. पोलिसांनी सांगितले की, छापा मारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य साठा मिळाला. यासह मोठ्या प्रमाणात स्पिरीटही आढळून आले. वेल्लानचिरा शहरातील कोडकारा येथे भाजपा नेत्याचा पॉल्ट्री फार्म आहे. या फार्ममधील गोदामात एका गूप्त खोलीत हा साठा ठेवण्यात आला होता. चलाक्कुडी आणि इरिनजालाकुडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात मद्य साठा जप्त केला. पॉल्ट्री फार्मच्या आसपास मद्य तयार करणारे कोणतेही युनिट नाही. या प्रकरणाशी निगडित इतरही आरोपी असण्याची शक्यता आहे, त्यांचा शोध सुरू आहे. या जागेवरून असे निदर्शनास येते की, इथून स्पिरीटची वाहतूक होत असावी. मात्र मद्याच्या बाटल्या कुठून आल्या, याचा अद्याप तपास सुरू आहे.

केरळमध्ये सध्या भाजपाचे फार अस्तित्व नाही. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपाचा जनाधार वाढविण्याचा गेल्या काही काळापासून प्रयत्न करत आहे. मात्र कर्नाटक या एकमात्र दक्षिणेतील राज्यातील सत्ताही काही महिन्यांपूर्वीच भाजपाला गमवावी लागली. त्यानंतर तेलंगणातही दारूण पराभव झाला. केरळमध्ये अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने केला जात आहे. यासाठी चर्चशी संवाद साधण्याची कल्पना काही काळात संघाकडून राबविण्यात आली होती.

राजकीय नेत्यांवरील छापेमारी चर्चेत

नुकतेच ओडिशा, झारखंड येथे काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीत ३५० कोटींहून अधिकची रक्कम आढळून आली होती. या प्रकरणाची देशभर चर्चा रंगली. केरळचे प्रकरण त्या तुलनेत छोटे असले तरी केरळमधील भाजपाची अवस्था पाहता, राज्याच्या डाव्या आघाडीच्या सरकारकडून या प्रकरणावरून भाजपावर टीका होण्याची शक्यता आहे.