पीटीआय, नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये जीएसटी चुकवल्याची २ हजार ७८४ प्रकरणे उघड झाली असून त्यामध्ये १४ हजार ३०२ कोटींची करचुकवेगिरी झाली, अशी माहिती केंद्र सरकारने सोमवारी संसदेला दिली. या गुन्ह्यासाठी २८ जणांना अटक करण्यात आली असून ५ हजार ७१६ कोटींचा चुकवलेला जीएसटी वसूल करण्यात आला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रश्नोत्तराच्या तासामध्ये एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये सीतारामन यांनी जीएसटी, आयकर चुकवेगिरीचे तपशील तसेच सीमाशुल्क विभागाकडून पकडण्यात आलेल्या तस्करीसंबंधी माहिती दिली. सरकारकडील आकडेवारीनुसार, २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीमध्ये जीएसटी चुकवल्याची ४३ हजार ५१६ प्रकरणे उघड झाली असून या कालावधीत २ लाख ६८ हजार कोटींपेक्षा जास्त जीएसटी चुकवेगिरी लक्षात आली आहे. यादरम्यान १ हजार २० लोकांना अटक करण्यात आली असून ७६ हजार ३३३ कोटी चुकवलेला जीएसटी वसूल करण्यात आला.

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये आयकर विभागाने राबवलेल्या शोध आणि जप्ती कारवायांमध्ये ३ हजार ९४६ समूहांवर शोध कारवाई करण्यात आली आणि ६ हजार ६६२ कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. गेल्या म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ७४१ समूहांवर शोध कारवाई करून १ हजार ७६५ कोटी ५६ लाख मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. तर गेल्या चार वर्षांमध्ये सीमाशुल्क विभागाकडून सुमारे ४६ हजार कोटी मूल्यांची ४२ हजार ७५४ तस्करीची प्रकरणे उघड करण्यात आली.