युक्रेन आणि रशियामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या युद्धाचा निकाल अद्याप लागला नसला तरी त्याचे भीषण परिणाम दोन्ही देशांना भोगावे लागत आहे. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर क्षेपणास्र डागले जात आहे. त्यातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या धमकीनंतर युक्रेनवर अण्वस्र हल्ल्याचे संकट घोघावत आहे. रशियाने हा हल्ला केल्यास युक्रेनमधील नागरिकांनी सामूहिक सेक्स पार्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. या भीषण परिस्थितीत युक्रेनमधील नागरिकांकडून या पार्टीसाठी नियोजन करण्यात येत आहे. ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या पार्टीसाठी ‘टेलिग्राम’ ग्रुपवर १५ हजार जणांनी नोंदणी केली आहे. ‘ऑर्गी ऑन शचेकाविस्ट्सा: ऑफिशियल’, यावर युक्रेनियन नागरिकांकडून नोंदणी करण्यात येत आहे.

रशियाच्या लष्करी प्रशिक्षण मैदानात अंदाधुंद गोळीबार; ११ जणांचा मृत्यू, चकमकीत दोन हल्लेखोर ठार

Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !

युक्रेनची राजधानी किव्ह शहरालगतच्या डोंगराळ भागात ही पार्टी होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्टीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना हातावर रंगीबेरंगी पट्ट्या बांधण्यास सांगण्यात आलं आहे. एनल सेक्सला प्राधान्य असणाऱ्यांनी हातावर तीन पट्ट्या तर ओरल सेक्ससाठी चार पटट्या बांधण्याचा नियम या पार्टीसाठी बनवण्यात आला आहे.

“नाटोच्या फौजा रशियावर चालून आल्या तर जगभरात विध्वंस होईल”, व्लादिमीर पुतीन यांचा गंभीर इशारा; सगळेच देश सतर्क!

“देशावर ओढवलेल्या वाईट परिस्थितीतही येथील लोक काहीतरी चांगलं शोधत आहेत. हा युक्रेनियन जनतेचा आशावाद आहे”, अशी प्रतिक्रिया रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका युक्रेनियन महिलेनं दिली आहे. “रशियाला आम्हाला दाखवून द्यायचे आहे की, आम्हाला घाबरवण्याचा त्यांनी प्रयत्न केल्यास आमच्या व्यक्तीमत्वात त्यांना वेगळे बदल दिसतील”, असे एका युक्रेनियन नागरिकाने या पार्टीबाबत म्हटले आहे.

विश्लेषण : जो बायडेन यांना सध्या अणुयुद्धाची भीती का वाटते?

रशियाने युक्रेनचे चार प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर रशियन भूभागाच्या संरक्षणासाठी अण्वस्रांचा वापर करण्याचा इशारा गेल्या महिन्यात पुतीन यांनी दिला होता. पुतीन यांच्या या भूमिकेचा संयुक्त राष्ट्राने निषेध नोंदवला होता. दरम्यान, नाटोच्या फौजांची रशियाच्या लष्कराशी चकमक झाल्यास जगभरात विध्वंस होईल, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाच्या अण्वस्र हल्ल्याच्या धमकीनंतर खबरदारी म्हणून युक्रेनमधील नागरिकांना पोटॅशियम आयोडाइडच्या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

Story img Loader