सोनसाखळी चोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 15 वर्षीय मुलावर गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. शालीमार बाग परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा रोहित क्लब रोडवर सकाळी 7.30 वाजता नारळ विकत होता. त्यावेळी त्याच्या स्टॉलवर उभ्या एका व्यक्तीची दोन दुचाकीस्वारांनी साखळी खेचण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चोरांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी रोहितने त्यांना अडवलं. यावेळी त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीदरम्यान एका आरोपीने गोळी चालवली. ही गोळी रोहितच्या खांद्याला लागली. जखमी अवस्थेत त्याला फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्याला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘आम्हाला सकाळी 8.30 वाजता रामबागमधून पीसीआर कॉल आला होता. रोहितमुळे चोरांचा प्रयत्न फसला आणि त्यांनी गोळी झाडली. आम्ही सध्या साक्षीदारांचा जबाब नोंदवत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहोत’, अशी माहिती डीसीपी असलम खान यांनी दिली आहे.

‘जेव्हा रोहितने आरोपी चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहिलं तेव्हा त्याने लगेच प्रतिक्रिया दिली. त्याने चोरांवर उडी मारुन त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यामधील एका चोराने बंदूक बाहेर काढून गोळी चालवली’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

रोहितचे वडील पप्पू रस्त्यावर नारळ विकतात. आजारी असल्याने रोहित काही दिवसांपासून स्टॉलवर काम करत होता. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7 ते 10 दरम्यान तो नारळ विकतो आणि नंतर सरकारी शाळेत जातो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी रोहितला खासगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात दाखल केलं आहे.