पाकिस्तानातील पंजाब प्रांतात लाहोर येथे एका घरात मोलकरणीचा बलात्कार करून खून करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी शेख शौकत व त्यांच्या तीन मुलांना फैझल टाऊन भागातून अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीची आई शमीम बिबी हिने तक्रार दिली होती. ही मुलगी पंधरा वर्षे वयाची होती. या मुलीवर खून करण्यापूर्वी बलात्कार करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक तारिक अझीज यांनी सांगितले, की शौकत यांच्या घरून काल फोन आला व त्या वेळी त्या मुलीचा मृतदेह छताकडे जाणाऱ्या जिन्यावर पडलेला दिसला. तिचे कपडेही जवळच पडलेले होते, बहुदा तिचा गळा आवळण्यात आला असावा. बिबी यांनी सांगितले, की आपल्या मुलीस चार महिन्यांपूर्वी शौकत यांच्या निवासस्थानी महिना चार हजारांची मोलकरणीची नोकरी मिळाली होती. शौकत यांच्या मुलांनी आपल्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिला ठार केले असावे. शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचे खरे कारण समजू शकेल.
अल्पवयीन मोलकरणीवर बलात्कार करून खून
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात लाहोर येथे एका घरात मोलकरणीचा बलात्कार करून खून करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी शेख शौकत व त्यांच्या तीन मुलांना फैझल टाऊन भागातून अटक केली आहे.
First published on: 07-01-2014 at 12:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 year old maid raped murdered in lahore