अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेली आणि संपूर्ण जगात मोठी खळबळ माजली. सर्वच देशांनी आपापल्या देशवासीयांना वाचवण्यासाठीची खटपट सुरु केली असून अनेक अफगाण नागरिकांनी मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचं सत्र सुरू केलं. या सगळ्या भीषण परिस्थितीमध्येच अजून एक गंभीर बातमी समोर येत आली ती म्हणजे साधारण १५० नागरिकांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याची. मात्र आता या बातमीमागचं सत्यही समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबान्यांनी ज्या नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यातले अनेक जण भारतीय असल्याची माहिती एएनआयने दिली होती. मात्र त्यानंतर लगेचच खुलासा करत एएनआयने अफगाण माध्यमांच्या हवाल्याने सांगितलं की, अशा प्रकारचं काहीही झालेलं नाही. अफगाणिस्तानमधले सर्व भारतीय तिकडे सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.


दरम्यान, अहमदुल्लाह वसेक नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने १५० भारतीयांचं अपहरण केलेलं नसल्याचा दावा अफगाण प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. मात्र आता एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हे निश्चित झालं आहे की, अफगाणिस्तानमधले भारतीय सुरक्षित आहेत.

काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने काबूलमधून ८५ भारतीयांना बाहेर काढलं आहे. हे विमान ताजिकीस्तानमध्ये उतरवण्यात आलं आहे. अजून एक विमान बचावकार्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 150 people mostly indians captured by taliban near kabul airport reports vsk