एका सर्वेक्षणानुसार भारतातल्या तब्बल १६ टक्के वयस्कर महिलांना छळ, शिवीगाळ आणि अयोग्य वर्तणुकीचा सामना करावा लागतो. यामध्ये शारीरिक हिंसेची प्रकरणं अधिक असतात. तसेच अपमान आणि मानसिक दुर्व्यहाराची प्रकरणंही मोठ्या प्रमाणात असतात. हेल्पएज इंडियाने गुरुवारी संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या वर्ल्ड एल्डर अब्युज अवेरनेस डेनिमित्त एक अहवाल जाहिर केला आहे. यात त्यांनी भारतातल्या ६० ते ९० वर्ष या वयोगाटीतल ७,९११ महिलांचं सर्वेक्षण केलं आहे. ‘वीमेन अँड एजिंग: इनव्हिजिबल ऑर एम्पावर्ड?’ असं शीर्षक या अहवालाला दिलं आहे.

या सर्वेक्षणात संस्धेने अशा महिलांचा समावेश केला आहे ज्यांचं वेगवेगळ्या प्रकारे शोषण झालं आहे. या सर्वेसाठी संस्थेने देशातल्या २० राज्यांमधील, २ केंद्रशासित प्रदेश आणि ५ मेट्रो शहरांमधील महिलांशी बातचित केली आहे. तसेच संस्थेने शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांचा यात समावेश केला आहे.

national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
nashik 25 year old woman hanged herself
जिल्हा रुग्णालय आवारात महिलेची आत्महत्या
Woman police officer assaulted by woman on bike
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना
Bangladeshi actor Fact Check video in marathi
भारतात अमेरिकन महिलेची छेडछाड? रिक्षातून जाताना केलं संतापजनक कृत्य; VIDEO नेमका कुठला? वाचा, सत्य काय ते…

या रिपोर्टनुसार भारतातल्या १६ टक्के वयस्कर महिलांशी दुर्व्यहार केला जातो. यापैकी अर्ध्याहून अधिक महिलांना मारहाण झाली आहे. तर ४६ टक्के महिला अनादर, अपमानित झाल्या आहेत. तर ३१ टक्के महिलांचा मानसिक छळ झाला आहे.

हे ही वाचा >> “आम्ही १० महिन्यांपूर्वी एक नाटक लिहिलं, त्याचं नाव…”, उदय सामंतांनी सांगितली बंडखोरीची कथा, म्हणाले, “त्याचे दिग्दर्शक-निर्माते…”

पोटच्या मुलांकडून छळ

या सर्वेक्षणात अशी माहिती समोर आली आहे की, या महिलांचा छळ होत असताना त्यांच्या मुलांनी त्यांची साथ दिली नाही. ४० टक्के महिलांचा छळ करण्यात त्यांची मुलंही सहभागी आहेत. तसेच इतर नातेवाईकांकडून ३१ टक्के महिलांचा छळ झाला आहे.

Story img Loader