राजधानी दिल्लीला क्राईम कॅपिटल असं म्हटलं जातं. याच दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. एक अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासह पार्कमध्ये बसलेली होती, ती घरी परतत असताना चौघे जण तिथे आले आणि त्यांनी या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दिल्लीतल्या शाहबाद डेअरी भागात ही घटना घडली आहे. या आरोपींना अल्पवयीन मुलगी ओळखत होती असंही समजतं आहे.

नेमकी काय घडली घटना?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतल्या शाहबाद डेअरी भागात असलेल्या पार्कमध्ये २७ जूनच्या रात्री ही अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासह गेली होती. मित्राला भेटून आल्यानंतर हे दोघंही घरी परतत होते. त्यावेळी हे चौघेजण तिकडे आले आणि त्यांनी तिच्याशी अश्लील वर्तन केलं. तसंच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर पीडिता तिच्या घरी गेली. तिने कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली. कुटुंबीय मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. मुलीचा जबाब नोंदवून तक्रार नोंदवण्यात आली आहे. यानंतर घटनास्थळी पोलीस पोहचले त्यांनी तिथल्या लोकांची चौकशी केली.

Woman Raped By Mantrik in Mumbai
Mumbai Crime : महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
Haryana BJP chief Mohan Lal Badoli and Jai Bhagwan
Mohan Lal Badoli: भाजपाच्या नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडित तरुणीने सांगितली अत्याचाराची आपबिती
Three arrested in rape molestation cases
बलात्कार, विनयभंगातील तीन आरोपींना अटक
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक

मुलीच्या मित्राने काढला पळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी दीड वाजता पार्कमध्ये गेली होती. ती परतत असताना तीन-चार जण तिकडे आले. त्यांनी या दोघांनाही धमकवण्यास सुरुवात केली. या घटनेच्या वेळी मुलीचा मित्र तिथून पळून गेला. त्यानंतर या तीन ते चार जणांनी मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर पोलिसांनी कलम ३७६ ड (सामूहिक बलात्कार), कलम ३२३, कलम ३४ यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच पीडितेचं वय १६ असल्याने सेक्शन ६ च्या अन्वये POCSO च्या अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. शाहबाद डेअरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त (Outer North ) रवि सिंग यांनी माहिती दिली आहे की ही घटना घडल्यानंतर आम्ही १९ वर्षांच्या बॉबीला अटक केली. त्याने त्याच्यासह जे इतर तिघे होते त्यांचीही माहिती दिली. आरोपींपैकी एक मुलगा अल्पवयीन आहे. त्यानंतर आम्ही इतर तिघांनाही अटक केली. हे सगळे शाहबाद डेअरी भागात राहणारे आहेत. सगळेच जण ड्रग्ज अॅडिक्ट आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

Story img Loader