उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. सामूहिक अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात सोमवारी घडली. येथील पाच नराधमांनी एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. तसेच पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा- “होय, बलात्कार करण्यासाठी घरात शिरलो, पण…”, मुंबईतील एअर हॉस्टेसच्या हत्येप्रकरणी आरोपीची धक्कादायक कबुली

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पीडित विद्यार्थिनीने काल तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आणि दोन संशयितांना अटक केली. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर इतर तीन आरोपींनाही जेरबंद करण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 years old minor student gang raped by 5 men in saharanpur all accused arrested crime in uttar pradesh rmm