१६व्या लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांनी गुरुवारी सदस्यत्वाची शपथ घेतली. लोकसभेचे हंगामी सभापती कमलनाथ यांनी सभागृहाला संबोधित केल्यानंतर, सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजप ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील खासदार म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रातील जालना मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. सभागृहातील बहुतांश खासदारांनी हिंदीतून शपथ घेतली असली तरी, भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि उमा भारती यांच्यासह डॉ. हर्षवर्धन यांनी संस्कृतमधून घेतलेली शपथ हे आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

Story img Loader