पाकिस्तानच्या वायव्येकडील रिसलपूर येथे दोघा दुचाकीस्वारांनी लष्करी संकुलावर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात ५ सैनिकांसह १७ जण जखमी झाले. पाकिस्तानात लष्कर भरती सुरू आहे. त्यासाठी रिसलपूर येथील लष्करी संकुलासमोर तरुणांनी गर्दी केली होती. त्याच वेळी दोन अज्ञात तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी संकुलाच्या प्रवेशद्वारावर दोन ग्रेनेडस् फेकली.  
हल्ल्यानंतर संपूर्ण भाग लष्कराने बंद केला असून तातडीने हल्लेखोरांना शोधायचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.   

Story img Loader