झोपोरीझिया : युक्रेनच्या झोपोरीझिया शहरात शनिवारी रात्री एका निवासी इमारतीवर रशियाने केलेल्या हल्ल्यात किमान १७ जण मृत्युमुखी पडले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. रविवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

झोपोरीझिया नगरपालिकेचे सचिव अनातोली कुर्तेव्ह यांनी ‘टेलीग्राम’वर दिलेल्या माहितीनुसार रात्री झोपोरीझिया शहरावर रशियाकडून रॉकेट हल्ले करण्यात आले. त्यात किमान २० दुकाने व ५० निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले. वीस जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युक्रेनच्या लष्करानेही या हल्ल्याला दुजोरा दिला. या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या इमारतीत राहाणाऱ्या ७३ वर्षीय तेतयाना लाजुन्को आणि त्यांचे पती ओलेस्की हल्ल्याचा इशारा देणाऱ्या भोंग्याचा आवाज ऐकून लपले. त्यांचा जीव वाचला असला तरी ते भेदरलेले आहेत.

Story img Loader