दिल्ली पोलिसांनी ज्येष्ठ दांपत्याच्या हत्येप्रकरणी 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. दक्षिणपूर्व दिल्लीमधील अमर कॉलनीत ही हत्या झाली होती. विशेष म्हणजे तरुणाने घरात प्रवेश करताना सलवार कमीज घातली होती. हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडताना मात्र त्याने कपडे बदलले आणि ऑफिसात जात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

27 जानेवारी रोजी 77 वर्षीय विरेंदर कुमार खनेजा आणि 72 वर्षीय सरला खनेजा यांचे मृतदेह आढळले होते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. दुसऱ्या दिवशी त्यांची मोलकरीण आणि तिच्या मुलाला पोलिसांनी अटक केली.

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, मोलकरणीनेच आपल्या मुलाला महिलेच्या वेशात घरात प्रवेश मिळवून दिला होता. तरुणाने गळा दाबून दांपत्याची हत्या केली आणि घरातील सर्व दागिने चोरले. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने घऱ सोडलं तेव्हा कॉर्पोरेट लूकमध्ये होता. हातात एक बॅग आणि ट्रॉली घेऊन तो घराबाहे पडला. त्यात सर्व चोरीचं सामान होते. आपण कोणाशी तरी बोलत असल्याचं तो भासवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याने घराबाहेर निघताना घातलेले कपडे तसंच दांपत्याची घराची आणि गाडीची चावी जप्त केली आहे.