वृत्तसंस्था, तेल अविव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाझामध्ये इस्रायल व हमासदरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये, इस्रायली सैन्याने रविवारी गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये १८ जण ठार झाले. मृतांमध्ये निर्वासितांच्या छावणीतील चौघांचा समावेश आहे. दुसरीकडे, इस्रायलची राजधानी तेल अविवच्या उपनगरामध्ये एका पॅलेस्टिनी नागरिकाने केलेल्या चाकू हल्ल्यात दोन इस्रायली नागरिक मरण पावले. दरम्यान, हेजबोला या बंडखोर संघटनेने इस्रायलवर शनिवारी मध्यरात्रीनंतर हवाई हल्ले केल्यामुळे तणावात भर पडली आहे.

गाझामधील युद्ध सुरू होऊन जवळपास १० महिने होत आहेत. गेल्या आठवड्यात दोन स्वतंत्र घटनांमध्ये दोन महत्त्वाच्या अतिरेक्यांच्या हत्या करण्यात आल्या. इस्रायलने स्वतंत्रपणे केलेल्या हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये हेजबोलाच्या वरिष्ठ कमांडरची तर इराणमध्ये हमासच्या वरिष्ठ राजकीय नेत्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर इराण आणि त्यांच्या मित्र संघटनांनी त्याचा बदला घेण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्धाची व्याप्ती वाढण्याच्या भीतीने तणाव वाढला आहे.

हेही वाचा >>>Waqf Board : वक्फ कायद्यातील प्रस्तावित सुधारणांवरून असदुद्दीन ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “आमच्या…”

पाश्चात्त्य देशांची खबरदारी

हेजबोला गटाने शनिवारी मध्यरात्रीनंतर उत्तर इस्रायलमध्ये डझनभर कात्युशा रॉकेट डागले. इस्रायलने डिर सिरियेन आणि कफार केला येथे केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल आपण हल्ले केल्याचा दावा हेजबोलाने केला आहे. यानंतर अमेरिका आणि काही पाश्चात्त्य देशांनी लेबनॉनमधील तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू केले आहेत. तर अमेरिकेसह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, फ्रान्स, इटली, कॅनडा, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, जॉर्डन या देशांनी आपापल्या नागरिकांना त्या देशातून बाहेर पडण्यास सांगितले आहे.

(लेबनॉनने उत्तर इस्रायलच्या गॅलिली भागामध्ये केलेले रॉकेट हल्ले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ हवाई संरक्षण प्रणालीने निष्प्रभ केले.)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 killed in gaza attack as tensions rise in west asia amy