गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या राज्यात भाजपाला आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्षानं कंबर कसली आहे. त्यातच गुजरातमध्ये पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लावल्यानंतर भडकलेले आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. ब्रिटिशांनी सुद्धा खाद्यपदार्थांवर कर लावला नव्हता, असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपा सरकारला फटकारलं आहे.

बापरे! २१ हजार कोटींची GST नोटीस; जाणून घ्या देशातील सर्वाधिक रकमेची कर नोटीस पाठवण्यात आलेलं नेमकं प्रकरण काय

“केंद्र सरकारकडून आकारला जाणारा जास्त जीएसटी देशातील महागाईचं मुख्य कारण आहे. हा जीएसटी कमी करून जनतेची महागाईतून सुटका करण्यात यावी”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ‘गुजरात अ‍ॅपीलेट अ‍ॅथॉरिटी ऑफ अडवाँस रुलिंग’ने (GAAAR) गुरुवारी पराठ्यांवरील १८ टक्के जीएसटी मंजूर केला आहे. ‘जीएएएआर’च्या विवेक रंजन आणि मिलिंद तोरावणे यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने पराठे साधी चपाती किंवा पोळीपासून वेगळे असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे पराठे चपात्यांच्या श्रेणीत मोडले जात नसल्याचे सांगत यावर १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.

Gujarat Assembly Election : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता

अहमदाबादेतील कंपनीचा १८ टक्के जीएसटीला विरोध

अहमदाबादेतील ‘वाडीलाल इंडस्ट्रीज’ या कंपनीने पराठ्यांवरील १८ टक्के जीएसटी कमी करण्याबाबत याचिका दाखल केली होती. ही कंपनी आठ प्रकारचे फ्रोजन पराठे तयार करते. चपाती आणि पराठे दोन्ही पिठापासून तयार होत असल्यानं यात जास्त अंतर नसल्याचे मत कंपनीने नोंदवलं होतं. त्यामुळे पराठ्यांवर १८ टक्क्यांऐवजी पाच टक्के जीएसटी आकारण्यात यावा, अशी मागणी कंपनीकडून करण्यात आली होती. मात्र, ‘जीएएएआर’ने कंपनीची मागणी फेटाळत पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी कायम ठेवला आहे.

“हे तोंडाचं गटार…”, मोदींना ‘नीच व्यक्ती’ म्हटल्याने स्मृती इराणी संतापल्या, त्यांच्या ९९ वर्षीय आईचा उल्लेख करत केजरीवालांना सुनावलं

‘जीएएएआर’चं म्हणणं काय?

अनेक प्रकारच्या पराठ्यांमध्ये गव्हाचे पीठ हा सामान्य घटक असतो. मात्र, या पराठ्यांमध्ये पाणी, खाद्यतेल, मीठ, बटाटे, भाज्या, मुळा, कांदे, मेठी यासह इतरही घटक असतात. या घटकांचा विचार करता चपाती किंवा पोळी आणि पराठे खूप वेगळे पदार्थ आहेत, असे ‘जीएएएआर’ने म्हटले आहे.

Story img Loader