शनिवारी झालेल्या तीव्र भूकंपानंतर रविवारीही भूकंपोत्तर धक्क्य़ांनी चीन हादरले असून मृतांची संख्या १८६ झाली आहे. २१ लोक अद्याप बेपत्ता असून जखमींची संख्या ११ हजार ५०० आहे. सिच्युआन प्रांतात शनिवारी झालेला भूकंप रिश्टर स्केलवर ७ इतका नोंदला गेला.
लुशान प्रांतात रविवारी १,१७० धक्के बसले. त्यातील अनेक धक्के हे ५.४ रिश्टर स्केलचे होते. सिच्युआन प्रांतातला हा पाच वर्षांतला दुसरा भूकंप आहे. २००८ मध्ये येथे झालेल्या भूकंपात तब्बल ९० हजार लोक दगावले होते.

Story img Loader