सिबेरियाच्या पूर्वेकडील अत्यंत दुर्गम अशा तैगा प्रांतात बुधवारी एमआय-८ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत लहान मुलांसह १९ जण ठार झाले. रशियातील हवाई उद्योगसमूहाला सध्या अपघातांचे ग्रहण लागले असून, सदर दुर्घटना त्यापैकीच एक ताजी घटना आहे.
मॉस्कोस्थित हवाई उड्डाण समितीने हेलिकॉप्टरमधील कर्मचारी बचावल्याचे म्हटले असले, तरी एकूण २८ जणांपैकी १९ जण ठार झाले आहेत. मात्र आपत्कालीन मंत्रालयाने मृतांच्या संख्येला दुजोरा दिलेला नाही.
खराब हवामानामुळे मदतकार्यात अडचणी येत असून अत्यंत दुर्गम डोंगराळ भागांत पोहोचण्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये तीन कर्मचारी आणि २५ प्रवासी होते, त्यापैकी १९ जण ठार झाले असून, हेलिकॉप्टर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलर एअरलाइन्सचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे याकुटिया प्रांतात तातडीने उतरविण्यात येत असताना ही दुर्घटना घडली. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला तारेने मृतांची संख्या कळविली, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा आणि मृतांचा शोध घेण्यासाठी आठ विमाने आणि २४० जणांचे मदत पथक तैनात करण्यात आले असून, त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळेपर्यंत आपण मृतांची संख्या सांगू शकत नसल्याचे आपत्कालीन मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयरिना रोसियस यांनी स्पष्ट केले.
अपघाताच्या स्थळी मदतकार्य करणारे कामगार पोहोचले असले तरी दाट धुक्यामुळे त्यांना या अपघातातून कोणीही बचावल्याचे आढळले नाही. त्याचप्रमाणे हेलिकॉप्टरचे अवशेषही आढळले नाहीत, असे रोसियस यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा