19 Passengers travelling in Autorickshaw Viral Video : ऑटो रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचा प्रकार आपण सर्रास पाहातो. पण क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे किती प्रवासी एका तीन चाकी रिक्षामध्ये बवावेत याला देखील काही मर्यादा असणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशच्या झाशी येथे एका रिक्षा चालकाने चक्क १९ प्रवासी ऑटोरिक्षामध्ये बसवून वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे. ऑटोमध्ये बसलेले १९ प्रवासी पाहून पोलिसांनाही धक्का बसला. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पॅसेंजर ऑटोमधून एक एक जण करून खाली उतरताना पाहायला मिळत आहेत. नंतर त्यांना रांगेत उभे करून त्यांची संख्या मोजली असता ते १९ जण असल्याचे आढळून आले.
एक ऑटो में कुल 18 सवारी.. चालक को मिला लीजिए तो 19 लोग.. गजब हाल है..
— Devesh Pandey (@iamdevv23) February 17, 2025
झांसी पुलिस ने फिलहाल ऑटो सीज कर दिया है! pic.twitter.com/1uKB2dg1zB
ही घटना शनिवारी (१५ फेब्रुवारी)रोजी उघडकीस आली जेव्हा बारूआसागर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपासणी नाक्यावर या ऑटो रिक्षाला अचानक थांबवण्यात आले. झाशी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. क्षेत्र अधिकारी तहरौली यांनी ऑटो चालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. हे लोक नेमकं कुठं जात होते याबद्दल माहिती मिळू शकली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दिनाँक 15.02.2025 की रात्रि में थाना बरुआसागर पुलिस द्वारा चेकिंग के दौरान 01 ऑटो को 19 सवारियों को बैठा कर ले जाते हुए पकड़ा गया है, उक्त सम्बन्ध में ऑटो चालक के विरुद्ध की जा रही विधिक कार्यवाही के सम्बन्ध में क्षेत्राधिकारी टहरौली की वीडियो बाइट- pic.twitter.com/tI6bORTxIQ
— Jhansi Police (@jhansipolice) February 16, 2025
झाशी पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या घटनेबद्दल माहिती दिली आहे. दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री बरूआसागर पोलिसांनी तपासणीदरम्यान ०१ ऑटोमध्ये १९ प्रवाशांना घेऊन जाताना पकडले आहे, असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना पाहायाला मिळत आहेत.