एपी, जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे रविवारी एका इंधन साठय़ास मोठी आग लागली. या दुर्घटनेत १९ जण मृत्युमुखी पडले. अद्याप तीन जण बेपत्ता आहेत. उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. उत्तर जकार्तामधील तानाह मेराह भागातील दाट लोकवस्तीजवळ सरकारी तेल आणि वायू कंपनी ‘पेर्टामिना’संचालित ‘प्लम्पांग इंधन डेपो’ आहे. ते इंडोनेशियाची २५ टक्के इंधनाच्या गरज या साठय़ाद्वारे पुरवली जाते.

अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले की, दोन तासांहून अधिक काळ शेजारच्या परिसरात आग आटोक्यात आणण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपूर्वी सुमारे २६० अग्निशमन दल जवान आणि ५२ अग्निशमन दल यंत्रणांची मदत घेण्यात आली. या दुर्घटनेच्या चित्रफितीत शेकडो नागरिक घाबरून पळत असल्याचे दिसत होते. दाट काळय़ा धुराचे लोट व ज्वाळांनी आकाश व्यापले होते.

fineotex chemical ltd marathi news
माझा पोर्टफोलियो : पटीपटीने वाढीच्या गुणाकाराचे ‘रसायन’
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
padsaad reders reactions on chaturang articles
पडसाद : पर्यटनाचे चोचले विनाशकारीच
Mumbai, Mutual Funds, Assets Under Management, Passive Funds, Active Funds, Motilal Oswal, Equity Schemes, Debt Schemes, Hybrid Funds, Investment Flows,
म्युच्युअल फंड मालमत्तेत दशकभरात सात पटींनी वाढ, ‘पॅसिव्ह’ फंडात गुंतवणूक वाढल्याचा अहवालाचा निष्कर्ष
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : युक्रेनने केले ते योग्यच!
garbage piled lying on silver beach since the month at madh island
मढच्या ‘सिल्वर’ समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य
Loksatta explained Ukraine attacked across the Russian border for the first time
युक्रेनचे सैन्य घुसले थेट रशियन हद्दीत! धाडसी कुर्स्क मोहिमेमुळे युद्धाचा रंग पालटणार?
Nankai Trough megaquake Mega Earthquake Alert in Japan,
सव्वातीन लाख मृत्यू, २३ लाख इमारती जमीनदोस्त… जपानमध्ये महाभूकंपाची शक्यता? कसा असेल ‘नानकाय ट्रो’ प्रलय? 

इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी रविवारी सकाळी दुर्घटनाग्रस्त भागास भेट देऊन गरजूंना सरकारी मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले, की त्यांनी संबंधित मंत्री व जकार्ता प्रांतपालांना इंधन साठय़ापासून परिसरातील रहिवाशांना हलवण्याचे अथवा हा इंधन साठा स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.

इंधनाचा दाब वाढल्याने समस्या

राष्ट्रीय पोलीस प्रमुख जनरल लिस्टो सिजिट प्राबोवो यांनी सांगितले, की पश्चिम जावा प्रांतातील बालोंगन शुद्धिकरण प्रकल्पातून मिळणाऱ्या इंधनाच्या दाब वाढल्याने तांत्रिक समस्या निर्माण होऊन ही आग लागली. ‘डेपो’जवळ राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की त्यांना पेट्रोलचा तीव्र वास येत होता, ज्यामुळे काही जणांना उलटय़ा झाल्या. त्यानंतर दोनदा मोठा गडगडाटासारखा आवाज होऊन मोठा स्फोट झाला.