Girl Murder : १९ वर्षीय मुलीचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळून आला आहे. या मृतदेहावर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या खुणा आहेत. मंगळवारी सकाळी हॉटेलमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या मित्राचा सोध सुरु केला आहे.

नेमकी कुठे घडली ही घटना?

एका मुलीचा मृतदेह ( Girl Murder ) मिळण्याची ही घटना बंगळुरुमध्ये घडली आहे. या मुलीचं नाव माया गोगोई रेखा असं आहे. तिचा मृतदेह ( Girl Murder ) बंगळुरु येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हाऊसकिपिंग कर्मचाऱ्याने आधी पाहिला. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. पोलीस मायाचा मित्र आरव हनॉयचा शोध घेत आहेत. बंगळुरुतील इंदिरा नगर भागात असलेल्या हॉटेल रॉयल लिव्हिंग या ठिकाणी ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ नोव्हेंबरला दुपारी १२.३० वाजता या दोघांनी हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. यानंतर आज सकाळी ८.३० वाजता आरव हॉटेलच्या बाहेर गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे. पोलीस उपायुक्त डी. देवराज यांनी ही माहिती दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
Woman murdered in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Bihar Class 10 Girl Accident
घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का, खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू
पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू

हे पण वाचा- दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास नकार दिल्याने मुलाची हत्या, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

पोलीस उपायुक्त देवराज यांनी काय सांगितलंं?

देवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार आरव हनॉय हॉटेलमध्ये येतानाच सुरा बरोबर घेऊन आला होता. तसंच त्याने झेप्टो या अॅपवरुन एक नायलॉनची दोरी मागवली होती. आमचा प्राथमिक अंदाज असा आहे की आरव हा माया गोगोई रेखाची हत्या ( Girl Murder ) करण्याच्या उद्देशानेच तिला या ठिकाणी घेऊन आला होता.

माया गोगोई रेखाच्या अंगावर अनेक वार

माया गोगोई रेखाच्या मृतदेहावर अनेक वार आहेत. तिचा मृत्यू छातीत भोसकल्याने झाला आहे तसंच तिच्या डोक्यावरही वार करण्यात आले आहेत. या प्रकरणात पहिला संशय तिचा मित्र आरव हनॉयवरच आहे. त्याने २४ किंवा २५ नोव्हेंबरला तिची हत्या केली असावी असा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर मृत्यू कधी झाला ती वेळ सांगता येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे. माया गोगोई रेखा तिच्या बहिणीसह पेईंग गेस्ट म्हणून हुडी या ठिकाणी राहात होती. आरव हनॉय हा तिच्या संपर्कात मागच्या काही महिन्यांपासून आला होता. आरव एका खासगी कंपनीत काम करतो असंही माया गोगोई रेखाच्या बहिणीने सांगितलं आहे. आरव हनॉयचा फोन स्विच ऑफ आहे मात्र आम्ही त्याचा शोध घेत आहोत असं पोलीस उपायुक्त देवराज यांनी सांगितलं. आता या प्रकरणात पुढे काय घडतं ते पाहणं महतत्वाचं असणार आहे.

Story img Loader