‘पद्मावत’ चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैद्राबादमध्ये ही घटना घडली असून, बलात्कारप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलगी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झालेल्या काही मित्रांसोबत प्रशांत थिएटरमध्ये ‘पद्मावत’ पाहण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पोलीस अधिकारी मतइया म्हणाले की, पीडितेवर चित्रपटगृहात बलात्कार झाला. दोन महिन्यापूर्वीच पीडिता आणि आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यावेळी फार कमी लोक असल्याने चित्रपटगृहाचा बराचसा भाग रिकामी होता. याच संधीचा आरोपीने फायदा घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीला ३१ जानेवारीला अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत टाकण्यात आले. आरोपीवर पोलिसांनी कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, बेजबाबदारपणे वागणाऱ्या चित्रपटगृह मालकाच्या विरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 year old girl was allegedly raped during padmaavat show at cinema hall