Crime News : शेजार्याच्या घरात १९ वर्षीय तरुणाने एका १५ वर्षीय मुलीची भोकसून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या फरीदाबाद शहरात ही घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे हा तरूणाला या अल्पवयीन पीडितेचे अपहरण केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मिळालेल्या माहितीनुसार, पवन (१९) हा ममता ज्या हाऊस हेल्प म्हणून काम करतात, त्यांच्या घरात घुसला, तेव्हा मृत मुलगी तिथचं होती. या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने तिच्या मानेवर आणि चेहर्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यानंतर पवन हा तेथून पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुलगी शेजारीच राहाणाऱ्या तिच्या घरात कामाला असलेल्या महिलेच्या घरी गेली होती, यावेळी ती महिला घरी नव्हती. शेजाऱ्यांनी रक्ताचे डाग असलेल्या कपड्यांमध्ये घरातून बाहेर जाताना पाहिले आणि काय झालं ते पाहण्यासाठी घरात धाव घेतली. त्यांना मुलगी गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ शासकिय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र येथे तिला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलीस अधिकारी मनजीत कुमार यांनी दिली. तसेच त्यांनी सांगितलं की पीडित मुलगी ही शाळेत जात नसे आणि आपल्या कपडे विक्री करणाऱ्या आईबरोबर राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनला २० एप्रिल २०२४ रोजी अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करण्यासाठी तिचं अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी मुलीच्या आईने तिच्या जबाबात आरोप केला होता की, पवनने १७ एप्रिल २०२४ रोजी त्याचा मित्र शोएबच्या मदतीने तिच्या मुलीला लग्नाच्या बहाण्याने फसवले. या प्रकरणात फक्त पवनला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर ३६३ (अपहरण), ३६६-अ , आणि ३४ या आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पवन हा सप्टेंबर २०२४ मध्ये तुरूंगातून जामीनावर बाहेर आला होता. त्याच्यावर अपहरण प्रकरणात खटला सुरू होता. दरम्यान मृत मुलीच्या आईने आरोप केला आहे की पनने चाकूने तिच्या मुलीची हत्या केली आहे. तसेच तिने असाही आरोप केला ही त्याचा मोठा भाऊ आणि कुटुंबिय, मित्र आणि त्याच्या आईने तिला अपहरणाचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती, फरिदाबाद पोलीसांच्या प्रवक्ते यशपाल यांनी यासंबंधी माहिती दिली.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बीएनएसचे कलम १०३(१), ३५२ (३) आणि ६१ (२) अंतर्गत पवन, तसेच त्याचा भाऊ, पालक, मित्र आणि त्याच्या आईविरोधात गु्न्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीच्या आईने हत्येनंतर पवन आणि त्याच्या कुटुंबियांवर धमकावल्याचा आरोप केला आहे, मात्र पोलिसांनी सांगितले की, तिने यापूर्वी कोणत्याही धमक्या मिळाल्याबद्दल तक्रार केली नाही. “आरोपीचे कुटुंबीय भंगाराचा व्यवसाय करतात. त्यांनी दावा केला आहे की तो (पवन) विद्यार्थी आहे. त्याला अटक केल्यावर आम्हाला त्याची चौकशी करावी लागेल. मुलगी घरी नसताना मोलकरणीच्या घरी का गेली हे देखील आम्हाला समजेल आणि आरोपीही नेमका तिथेच कसा पोहोचला हे देखील त्याला अटक केल्यानंतरच समजेल” असेही इन्स्पेक्टर कुमार यांनी सांगितले.
गुन्हे शाखा आणि पोलिस पथके पवनला पकडण्यासाठी शोध घेत आहेत, असेही पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.