दिल्लीतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आणि मुंबईतील ३२ वर्षीय महिलेच्या खूनाने देशात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच तेलंगणातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. अज्ञातांनी १९ वर्षीय तरुणीचा निर्दयीपणे खून केला आहे. यानंतर तरुणीचा मृतदेह तलावात आढळून आला आहे.
नेमकं काय घडलं?
तेलंगणातील विक्राबाद जिल्ह्यातील कालापूर गावात ही घटना घडली आहे. येथे एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह तलावात सापडला आहे. या तरुणीचे डोळे स्क्रू ड्रायव्हरने फोडले आहेत. तर ब्लेडने गळा चिरला आहे. यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा : अमेरिकेत मध्यरात्री घडला हिंसाचार; रस्त्यावर पार्टी करणारे १३ विद्यार्थी जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, जट्टू सिरिशा असं मृत तरुणीचं नाव आहे. जट्टू १० जूनला रात्री ११ वाजता घरातून बाहेर पडली होती. यानंतर तलावात जट्टूचा मृतदेह रक्ताने माखलेल्या स्थितीत परिसरातील नागरिकांना आढळून आला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. ‘इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त दिलं आहे.