दिल्लीत अपघाती निधन झालेले केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे प्रवास करताना नेहमी ‘टोयोटा’ कंपनीची ‘लेक्सस’ गाडी वापरत असत आणि दर तीन वर्षांनी मुंडे पांढऱया रंगाची नवी ‘लेक्सस’ गाडी घेत असत. पण, मंगळवारी दिल्ली विमानतळावर जाताना गोपीनाथ मुंडे ‘एसएक्स ४’ गाडीतून प्रवास करत होते.
घातपाताच्या शक्यतेची गुप्तचर विभागाकडून तपासणी
या वर्षाच्या सुरूवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत गोपीनाथ मुंडे यांना अपघात आणि ते या समीकरणावर विचारले असता ते म्हणाले होते, “एका अपघातात माझ्या मानेला जबर दुखापत झाली होती. तेव्हापासून मला मानेचा त्रास असल्यामुळे ‘टोयोटा’ची ‘लेक्सस’ गाडी मी वापरु लागलो. ‘लेक्सस’ गाडी मला सुरक्षित आणि आरामदायी वाटते. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून मी लेक्सस गाडी वापरतो आहे.” तसेच आतापर्यंत चार ‘लेक्सस’ गाड्या बदलल्या असून, दर तीन वर्षांनी माझी ‘लेक्सस’ गाडी बदलत असते, असेही मुंडे यांनी सांगितले होते.
मुंडे आणि अपघात हे समीकरणच..
मात्र, मंगळवारी सकाळी गोपीनाथ मुंडे ‘लेक्सस’ ऐवजी दुसऱया गाडीतून नवी दिल्ली विमानतळावर जात असताना त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात मुंडे यांचे निधन झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा